हायलाइट्स:
- बुलडाणाकरांनी लक्ष द्या!
- आता ‘या’ हेल्पलाईन क्रमांकावर फोन करताच १० मिनिटांत मिळणार मदत
- नवी मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी या हेल्पलाइन नंबरचे कॉल सेंटर
बुलडाणा जिल्ह्यात ११२ हेल्पलाइन नंबरची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून पोलीस नियंत्रण कक्षामार्फत हे सर्व हाताळली जाणार आहे. राज्यात नवी मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी या हेल्पलाइन नंबरचे कॉल सेंटर असणार आहे. ११२ नंबरवर कॉल केल्यास तो कॉल ज्या जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाशी जोडला जाऊन नंतर ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत आहे. त्यांना ताबडतोब कळवण्यात येणार आहे आणि जवळपास दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल होणार आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात ११२ हेल्पलाइन नंबरच्या यंत्रणेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अतिरिक्त पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनात दीपक पवार आणि करूनाशील तायडे या सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांची सुपरवायझर म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला १६ डिस्पॅचर आणि ४९० प्रशिक्षित पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
महिंद्रा सिक्युरिटी सिस्टीमच्या मार्गदर्शनात ही सर्व यंत्रणा काम करणार आहे. त्यासाठी आज रोजी जिल्ह्यात १९ चार चाकी वाहने, १० दुचाकी वाहने उपलब्ध असून लवकरच ४२ चारचाकी वाहने आणि ४३ दुचाकी वाहने यामध्ये दाखल होणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times