हायलाइट्स:

  • कोकणातील ‘या’ मराठमोळया उद्योजकावर कॅनडाचे पंतप्रधानही खुश
  • वाढदिवसानिमित्त पाठवलं खास गिफ्ट
  • कामगारावर प्रेम करणारा अवलिया म्हणून सतीश वाघ यांची ओळख

रत्नागिरी : खेड कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील लोटे येथील सुप्रिया केमिकल कंपनीचे मालक उद्योजक सतीश वाघ यांना ६५ व्या वाढदिवसानिमितांने कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्याकडून कौतूकाचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे मराठमोळया उद्योजकाचे गौरव प्रमाणपत्र प्रसिद्ध लेखक, कॅनडाच्या पंतप्रधानांचे दूत डॉ. ढवळे यांनी कॅनडाहून आणले व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सतीश वाघ यांना हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

सुप्रिया केमिकल कंपनीचे मालक सतीश वाघ यांच्या सुप्रिया केमिकल कंपनीचे काम सातासमुद्रापार पोहचले आहे. कंपनीच्या हिताच्या दृष्टीने वाघ ही अहोरात्र परिश्रम घेत आहेत. ‘ओषधी रसायने व औषधी मूलद्रव्य’ याचे उत्पादन सतीश वाघ यांच्या सुप्रिया केमिकल्स कंपनीच्या माध्यमातून घेतले जाते.
११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, शरद पवारांनी जनतेला केलं मोठं आवाहन
गेली तब्बल ३६ वर्षे ते उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यासाठी जगभर भ्रमंती करीत असतात. त्यांच्या कंपनीवर अनेक कामगारांचे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे आणि कामगारावर नितांत प्रेम करणारा अवलिया म्हणून सतीश वाघ यांची कोकणात विशेष ओळख आहे. नुकताच त्यांचा ६५ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला यावेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली व कौतूक केले.

उद्योजक सतीश वाघ आपले काम कोतुकास्पद आहे उत्तरोत्तर अशीच प्रगती करून देशाचे नाव उज्जल करावे अशा शब्दात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी प्रमाणपत्रच्या माध्यमातून दिल्या आहेत. मराठी उद्योजक सतीश वाघ यांचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी कोतुक केल्याबद्दल अनेकांनी सतीश वाघ यांचे कोतुक केले आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here