मुंबई :बॉलिवूडमधील नव्या कलाकारांच्या फळीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे कार्तिक आर्यन. त्याचे लाखो चाहते आहेत. तो सातत्यानं त्याच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या मदतीनं संवाद साधत असतो.

नुकताच त्यानं त्याच्या चाहत्यांशी ‘आस्क मी एनिथिंग’द्वारे संवाद साधला होता. यावेळी एका नेटकऱ्यानं कार्तिकला चक्क धमकीच दिली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. त्यात जेव्हा आपल्या आवडत्या कलाकाराशी बोलण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना आनंद होतो.
आर्यनच्या अटकेनंतर आर माधवन आणि त्याच्या मुलाचा ‘तो’ फोटो होतोय व्हायरल


तसाच आनंद एका चाहतीला झाला. मात्र, सेलिब्रिटी हे त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही. हे पाहता एक चाहती कमेंट करत म्हणाली, ‘जेव्हा तुम्हाला इतरांशी बोलून वेळ मिळेल, तेव्हा मेसेज करा, नाही तर मी माझी नस कापून टाकेन.’ यावर कार्तिकनं शांतपणे उत्तर दिलं आणि म्हणाला, ‘असा विचार कधीच करू नकोस.’ तो नेहमीच चाहत्यांचा आदर करत त्यांच्याशी संवाद साधत असल्यामुळे त्यानं या कमेंटचीही दखल घेतली आहे.



Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here