हायलाइट्स:

  • ४५ वर्षीय व्यक्तीचा टोळीने केला खून
  • दगडाचा वापर करून ठेचून खून
  • परिसरात भीतीचं वातावरण

सातारा : सातारा शहरातील दिव्यानगरी येथे संतोष उर्फ विठ्ठल सुळ (वय ४५, रा. दिव्यनगरी) याचा एका टोळीने खून केल्याची घटना समोर आली आहे. संतोष सुळ याच्यावर दांडके आणि दगडाचा वापर करून ठेचून खून करण्यात आला आहे.

दिव्य नगरी रस्त्यात सकाळी ११ वाजता संतोष सुळ याला अडवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

court rejects bail application of aryan khan:आर्यन खानला मोठा धक्का; कोर्टाने जामीन नाकारला, तुरुंगात रवानगी

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आर्थिक देवाण-घेवाण व जमिनीच्या कारणातून हा खून झाल्याचं समोर येत आहे. संशयितांनी हल्ला केल्यानंतर सुळ गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी तेथून पसार झाले.

पोलिसांचा घटनस्थळाचा पंचनामा केल्यानंतर संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here