हायलाइट्स:

  • लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात मंत्रीपुत्र आशिष मिश्रा मुख्य आरोपी
  • पोलिसांसमोर हजर होण्यासाठी आशिष मिश्रा याला दुसऱ्यांदा नोटीस
  • आशिष मिश्रावर हत्येसहीत इतर कलमांखाली गुन्हा दाखल

लखनौ: उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या घटनेनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आणि मुख्य आरोपी आशिष मिश्रा याच्या अटकेची मागणी जोर धरतेय. याच विषयावर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘कायदा हातात घेण्याची सूट कुणालाही नाही परंतु, कुणाच्या दबावाखाली कोणतीही कारवाई होणार नाही’ असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.

‘लखीमपूर खीरीची घटना अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. सरकार या प्रकरणाचा खोलवर तपास करेलच. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही. कायदा सगळ्यांना समान सुरक्षा प्रदान करण्याची हमी देतो. त्यामुळे कुणालाही कायदा आपल्या हातात घेण्याचा अधिकार नाही, मग तो कुणीही असो’ अशी पुश्तीही योगी आदित्यनाथ यांनी जोडली.

गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राच्या बचावाचा प्रयत्न होतोय का? या प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी पुरावा मागितलाय. ‘कोणत्याही व्हिडिओत हे स्पष्ट होत नाही. कुणाकडेही पुरावा असेल तर तो अपलोड करण्यासाठी आम्ही नंबरही जारी केला आहे. लवकरच सगळं स्पष्ट होईल. कुणावरही अन्याय होणार नाही’ असं त्यांनी म्हटलं.

माननीय सर्वोच्च न्यायालयानं व्यवस्था केलीय की अटकेपूर्वी तुमच्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध असावेत. केवळ कुणाच्याही आरोपावरून अनावश्यक कुणालाही अटक करू शकत नाही, असं म्हणतानाच ‘जर कुणी दोषी असेल तर त्याला सोडलं जाणार नाही, मग तो व्यक्ती कुणीही असो’ असं सांगण्यास मुख्यमंत्री योगी विसरले नाहीत.

‘आम्ही सगळ्या उत्तर प्रदेशात हेच केलंय. ज्यांच्या कुणाविरोधात कारवाई करण्यात आलीय, त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळले आहेत. तेव्हा आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास कोणतीही भीड बाळगली नाही. लखीमपूर खीरी घटनेतही सरकार हेच करतंय’, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.

लखीमपूर हिंसाचार: कारवाईत ढिसाळपणा, कोर्टानं यूपी सरकारला फटकारलं
Ashish Mishra: लखीमपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा नेपाळला पळाल्याचा दावा
सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

उल्लेखनीय म्हणजे, आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत घटनेनंतर पाच दिवस उलटल्यानंतरही मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला अटक झालेली नसल्याचं नमूद करताना कारवाईबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या ढिसाळपणावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेत. हत्या प्रकरणातील आरोपीला हजर होण्यासाठी विनंती करण्याची काय गरज आहे? असा प्रश्नही न्यायालयानं विचारला.

राज्य सरकारनं या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे का? या सर्वोच्च न्यायालयानं विचारलेल्या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर राज्य सरकारकडून देण्यात आलंय.

लखीमपूर हिंसा प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला पोलिसांनी समन्स बजावत आज (शुक्रवारी) सकाळी १०.०० वाजता चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, आशिष मिश्राकडून आणखी वेळ मागण्यात आलीय. यानंतर त्याला उद्या, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी (शनिवारी) ११.०० वाजेपर्यंत वेळ दिण्यात आला आहे. तशी एक नोटीस पोलिसांकडून आशिष मिश्राच्या घरावर चिटकवण्यात आलीय.

Coronavirus: एकाचवेळी पाच लाख रुग्णांना हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज, केंद्राचा दावा
चर्चा तर होणारच! मुख्यमंत्री गहलोत, सचिन पायलट यांचं एकत्र उड्डाण

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here