यूट्यूबवरील व्हिडिओंच्या आधारावर अभिनेत्री स्वरा भास्करविरोधात वकील विजय बक्षी यांनी ही देशद्रोहाची तक्रार केलीय. स्वरा भास्करविरोधात कलम १२४ अ, १५३ अ, १५३ ब आणि ५०५ (२) नुसार तक्रार केली आहे. कोर्टाने ही तक्रार दाखल करून घेत माझ्या फिर्यादीसाठी २० मार्चची तारीख दिलीय, अशी माहिती विजय बक्षी यांनी एनबीटी ऑनलाइनला दिली.
स्वरा भास्करचा व्हिडिओही बघितला
स्वरा भास्कर ही दोन समाजांमध्ये फूट पाडण्यासाठी चिथावणीखोर भाषणं करत फिरत आहे. यामुळे वाद होत आहेत. मी ही तिचा एक व्हिडिओ बघितला. ज्यामुळे दिल्लीत दंगलीचं वातावरण निर्माण झालं. दिल्लीतील हिंसाचारात हेड कॉन्स्टेबल रतन लाल आणि आयपीचे अधिकारी अंकित शर्मांची हत्या झाली. यासर्व कारणांमुळे स्वरा भास्करविरोधात देशद्रोहाची तक्रार केलीय, असं बक्षी यांनी सांगितलं.
सरकारकडून घेणार परवानगी
कलम २०० नुसार फिर्यादीचा जबाब मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवला जातो. माझा जबाब त्यांच्यासमोर नोंदवणार आहे. साक्ष नोंदवल्यानंतर मी सरकारकडे देशद्रोहाचा खटला चावलवण्याची मागणी करणार आहे. जसं कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल सरकारने मंजुरी दिलीय. त्यानंतर देशद्रोहाचा खटला भरवला जाईल, असं वकील विजय बक्षी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times