हायलाइट्स:
- स्वत:च्या प्रेयसीबाबतच तरुणाने केलं धक्कादायक कृत्य
- अत्याचार करू देण्याचे प्रियकर घेत होता ५०० रुपये
- आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली. या प्रकरणातील पीडित युवती ही अल्पवयीन असून ती १६ वर्षांची आहे.
पीडित मुलीची घरची परिस्थिती बेताची आहे. तिचे पालक हातमजुरी करून पोट भरतात. सर्वच आरोपीसुद्धा मजुरी करतात. आकाश आणि या मुलीचे प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जातं. या दोघांमध्ये शारीरिक संबंधसुद्धा होते असा आरोप करण्यात आला आहे. आकाश तिच्यावर बळजबरी करत असे. याखेरीज इतर आरोपी हे आकाशचे मित्र आहेत. तेसुद्धा तिच्यावर बळजबरी करत असत. आकाश स्वत: त्यांना ती करू देत असे आणि प्रत्येकाकडून पाचशे रुपये घेत असे असा धक्कादायक आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
अखेर या मुलीने तिच्या आईसोबत एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times