लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचे पती राजीव हे ही भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल पदावर कार्यकरत आहेत. यानुसार माधुरी आणि राजीव हे देशातील पहिले पती-पत्नी आहेत जे लेफ्टनंट जनरल झाले आहेत. माधुरी कानिटकर या गेल्या ३७ वर्षांपासून भारतीय लष्कराच्या सेवेत कार्यरत आहेत. गेल्या वर्षी लेफ्टनंट जनरल पदासाठी त्यांची निवड झाली होती. पण पद रिक्त नसल्याने आज त्यांना पदाची सूत्रे देण्यात आली.
नौदलात डॉ. पुनीता अरोरा यांनी पहिल्यांदा व्हाइस अॅडमिरल पद भूषविले होते. तर पद्मावती बंडोपाध्याय या हवाई दलात दुसऱ्या महिला ठरल्या ज्यांनी एअर मार्शल पदापर्यंत मजल मारली होती. आता लष्करात माधुरी कानिटकर यांनी हा गौरव मिळवला आहे.
महिलांच्या पोस्टिंगवर सुप्रीम कोर्ट म्हणाले होते
देऊन निवृत्त होईपर्यंत सेवेत राहण्याचा अधिकार देणारा अतिशय महत्त्वपूर्ण आदेश १७ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने दिला होता. महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये चौदा वर्षापर्यंत लष्करात सेवेत राहता येत होते, पण त्यानंतर त्यांना निवृत्त होईपर्यंत नोकरी करता येत नव्हती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे लष्करात महिलांना पूर्णवेळ कर्नल किंवा त्यावरचे पद मिळू शकते. यामुळे योग्यतेच्या आधारावर महिलांना, तत्वतः ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल आणि लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times