बेकायदा शस्त्रांना आळा घालण्यासाठी केवळ शस्त्र बाळगणाऱ्यांना पकडून चालणार नाही तर त्यांचा उगम शोधून तेथे कारवाईची गरज आहे. हे लक्षात घेता नाशिक परिक्षेत्रातील पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. येथे पकडण्यात आलेल्या शस्त्रांचे उगमस्थान शोधून परराज्यात जाऊन कारवाई करण्यासाठी खास पथक स्थापन करण्यात आले आहे. गुगल मॅप आणि स्थानिक पोलिसांची मदत घेत शेजारच्या राज्यांतील बेकायदा शस्त्र निर्मितीच्या कारखान्यांचा शोध सुरू आहे.
वाचाः
नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी यासंबंधी माहिती दिली. या परिक्षेत्रात येणाऱ्या नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांना आवाहन करून बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती मागविली आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात शस्त्रे येतात. तेथे जाऊन कारवाई करणे महाराष्ट्र पोलिसांना शक्य होत नाही. दुर्गम भागातील या ठिकाणांवर जाणे अवघड होते. त्यामुळे जळगावच्या पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एका खास पथकाची निर्मिती केली आहे. हे पथक तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून परराज्यातील असे बेकायदा कारखाने शोधून काढणार आहे. त्याचबरोबर परिक्षेत्रात गेल्या पाच वर्षांत बेकायदा शस्त्रांच्या आधारे घडलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. नव्याने शस्त्र बाळगणाऱ्यांना पकडण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. या सर्व माहितीचा वापर करून परराज्यातून होणारा पुरवठा रोखण्यासाठी ही मोहीम आखल्याचे शेखर यांनी सांगितले.
वाचाः
बेकायदा शस्त्रांच्या आधारे गुन्ह्यांचा वापर होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: तरुण पिढीही याच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ही मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी यासंबंधीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे. डॉ. बी. जी. शेखर, पोलिस उपमहानिरीक्षक, नाशिक
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times