वॉशिंग्टन: अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिका आता तालिबानसोबत चर्चा करणार आहे. अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर आणि तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर ही पहिलीच बैठक असणार आहे. शनिवारी आणि रविवारी दोहामध्ये अमेरिकन शिष्टमंडळ आणि तालिबान नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अमेरिका आणि तालिबान दरम्यानच्या भेटीत अमेरिकन नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अमेरिका दबाव टाकण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, महिलांचे अधिकार आणि करारानुसार, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इतर देशांविरोधात करू न देणे या मुद्यावरही तालिबानवर दबाव टाकला जाणार आहे.

अफगाणिस्तान: मशिदीवरील आत्मघाती हल्ल्यात ४६ ठार; आयएसने घेतली जबाबदारी
तालिबानला मान्यता देण्याचा मुद्दा या बैठकीत नसणार असेही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तालिबान सरकारला मान्यता हे त्यांच्या कामाच्या आधारेच दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.

अमेरिकेला धक्का; चीनजवळ आण्विक पाणबुडीचा रहस्यमय अपघात, ११ जखमी
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, अफगाणिस्तानमध्ये सध्या अडकलेल्या अमेरिकन व इतर परदेशी नागरिकांना सुखरूपपणे मायदेशी आणण्यासाठीची योजना तयार करणे हे या बैठकीचा मुख्य मुद्दा आहे. अमेरिकन शिष्टमंडळ या मुद्यावर अधिक भर देणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here