सिंधुदुर्ग : Chipi airport inauguration : चिपी विमानतळाचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी  केंद्रीय मंत्री नारायण राणे,  उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते. (Chipi airport inauguration by Chief Minister Uddhav Thackeray) दरम्यान, या कार्यक्रमाला हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे ऑनलाईन हजर होते.

चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभाआधी राजकीय वाद उफाळून आला होता. याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि नारायण राणे, भाजप यांच्यात चढाओढ दिसून येत होते. त्यामुळे आजचा कार्यक्रमाकडे लक्ष लागले होते. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज उद्घाटन अखेर झाले. ठाकरे आणि राणे आजच्या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाला अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

मात्र, चिपी विमानतळाचे आज लोकार्पण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे लोकार्पण पार पडले. हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. मुख्यमंत्री आज विशेष विमानाने चिपी विमानतळावर दाखल झाले. त्यापाठोपाठ मुंबईतून निघालेल्या अलायन्स एअरच्या विमानाने केंद्रीय मंत्री नारायण राणे या सोहळ्याला दाखल झाले. राणे यांच्यासह शिवसेना भाजप नेते विमानात एकत्र होते. पहिले प्रवासी विमान चिपीच्या धावपट्टीवर लँड झाल्यावर विमानावर दोन्ही बाजूंनी पाण्याची कमान करत विमानाला अनोखी मानवंदना देण्यात आली.

काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्याचवेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागतच करणार आहोत. मुख्यमंत्री शेजारी असणे हा चांगला क्षण आहे. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.Zee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here