इस्लामिक रिपब्लिक ऑफ ब्रॉडकास्टिंगने (IRIB) नवीन सेन्सॉरशिप नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार आता ही बंधने लागू करण्यात आली आहेत. बंधने घातलेली अथवा साधर्म्य असणारी दृष्ये टीव्हीवर दाखवण्याआधी IRIB ची परवानगी घ्यावी लागणार आहे. IRIB चे जनसंपर्क अधिकारी आमिर हुसैन शमशादी यांनी सांगितले की, काही नियमांचा आढावा घेतल्यानंतर नवीन मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली.
Pishgoo च्या शोमध्ये अभिनेत्रीचा चेहरा दाखवला नाही
सप्टेंबर महिन्यात इराणी टॉक शो Pishgoo मध्ये अभिनेत्री एल्नाज हबीबीचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. या शोच्या दरम्यान अभिनेत्री एल्नाज हबीबीचा आवाज ऐकू येत होता. त्यानंतर सेन्सॉरशिपच्या नवीन नियमाचा वापर सुरू झाला असल्याची चर्चा सुरू झाली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times