आग्राः नवी दिल्लीहून दिब्रूगढला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये ५ बॉम्ब असल्याची अफवा पसरवणाऱ्याला आग्र्यातून अटक करण्यात आलीय. आरोपीचं नाव संजीव सिंह गुर्जर आहे. त्याने शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाला टॅग करत ट्विट केले होते. ट्रेन नंबर 12424 राजनाधी एक्स्प्रेस जी नवी दिल्लीहून कानपूरला जात आहे त्या गाडीत ५ बॉम्ब आहेत, असं ट्विट त्याने केलं होतं. हे ट्विट पाहताच संबंधित सर्व यंत्रणांची झोप उडाली होती.

बॉम्बच्या ट्विटनंतर दादरी रेल्वे स्टेशन राजनधानी एक्स्प्रेसला रोखण्यात आलं. बॉम्ब अफवेने ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर गौतमनगर येथून बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण गाडी तपासण्यात आली. पण तपासात कुठलीही संशयित वस्तू आढळून आली नाही.

‘त्याने पुन्हा ट्विट केलं…’

यादरम्यान संध्याकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी आरोपी संजीवने पुन्हा ट्विट केलं. ‘हे ट्विट मानसिक तणावातून केलं आहे. माझ्या भावाच्या ट्रेनला ४ तास उशीर झाला. यामुळे मी प्रचंड संतापलो होते. यासाठी भारत सरकारची माफी मागतो’, असं त्याने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं.

रेल्वे पोलिसांनी असा मिळवला नंबर

राजनाधी एक्स्प्रेसची तपासणी केल्यानंतर या गाडीला तीन तास उशिराने रवाना करण्यात आलं. आरोपी संजीवच्या ट्विटनंतर जीआरपीकडून त्याला सतत ट्विट करण्यात येत होतं. त्याचा नंबर मागण्यात येत होता. जीआरपीने त्याला आपला मोबाइल नंबरही दिला. पण आरोपी संजीवने त्यावर कॉल केला नाही. मग यू-ट्यूब लिंकवर रेल्वे पोलिसांनी त्याचा मोबाइल नंबर शोधून काढला.

आरोपी मध्य प्रदेशचा राहणारा

रेल्वे पोलिसांनी आरोपी संजीव सिंह गुर्जरला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली. अफवा पसरवणारा संजीव हा ग्वाल्हेरमधील मुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजय विहार कॉलनीत राहतो. त्याविरोधात कलम ५०५ आणि रेल्वे कायद्यांतर्गत १७४नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here