हायलाइट्स:
- गुरुग्रामच्या खासगी विद्यापीठात गोळीबाराची घटना
- कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाचं मेडिकलच्या विद्यार्थ्यावर गोळीबार
- मैत्रिणी संबंधातील वादातून दोन तरुणांचा वाद
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या फर्रुखनगर स्थित एसजीटी विद्यापीठात शुक्रवारी हा प्रकार घडला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची भररस्त्यात गोळी घालून हत्या करण्यात आलीय. मैत्रिणी संबंधी दोन तरुणांत झालेल्या वादानंतर ही हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे.
मृत विनित एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो उत्तर प्रदेशच्या शामलीचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनीत आणि लक्की या दोन तरुणांमध्ये काही गोष्टींवरून वाद झाला. यानंतर कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या लक्कीनं विनितवर गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या विनितला तातडीनं युनिव्हर्सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी लक्की आणि त्याचे मित्र घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणात पोलिसांनी विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. आरोपींना शोधून काढण्यासाठी आणि पुराव्यांसाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतलीय.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये धास्तीचं वातावरण आहे. तसंच पालकांकडून विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times