अमेरिकेला धमकी?
राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केलेले वक्तव्य हे अमेरिकेलाच धमकी असल्याचे म्हटले जात आहे. मागील वर्षभरापासून तैवानच्या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चीनला तैवान कराराचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मागील महिन्यात झालेल्या चर्चेत चीनच्या राष्ट्रपतींना तैवान कराराचे पालन करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता चीनने तैवान हा आमचा अंतर्गत मुद्दा असून कोणत्याही देशाचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे म्हटले.
लष्करी बळाचा वापर करण्याची धमकी
तैवान स्वत:ला स्वतंत्र देश म्हणत असला तरी चीनचाच तो भूभाग आहे. चीनसोबत तैवानचे एकत्रिकरण करण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्यासही मागे हटणार नसल्याचे जिनपिंग यांनी म्हटले.
मागील आठवड्यात चीनच्या जवळपास १५० लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर तैवान, अमेरिकेने चिंता व्यक्त केली. चीनने तैवानवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा तैवानने दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times