हायलाइट्स:

  • डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर
  • डेन्मार्कच्या पंतप्रधानांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वागत
  • राष्ट्रपती भवनात पार पडला औपचारिक स्वागत सोहळा

नवी दिल्ली : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आज मेट फ्रेडरिक्सन यांचं औपचारिकरित्या स्वागत करत आदरातिथ्य केलं. या दरम्यान दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर देशांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, असं म्हणत मेट यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. तसंच त्यांनी पंतप्रधान मोदींना डेन्मार्कला येण्याचं आमंत्रणही दिलं.

मेट फ्रेडरिक्सन आजपासून (९ ऑक्टोबर) ११ ऑक्टोबरपर्यंत आपल्या भारत दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. परराष्ट्र राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांनी दिल्ली विमानळावर दाखल होत मेट फ्रेडरिक्सन यांचं स्वागत केलं. उल्लेखनीय म्हणजे, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेट फ्रेडरिक्सन यांच्या द्विपक्षीय चर्चेत राज्यमंत्री एस जयशंकर हेदेखील सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट यांचं स्वागत केल्यानंतर राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत सोहळा पार पडला.

Lakhimpur Kheri: मोदी-शहा पुतळा दहन, शेतकरी महापंचायत… संयुक्त किसान मोर्चाची घोषणा
UP Elections: यूपी निवडणुकीत योगींना दुसऱ्यांदा संधी मिळणार? काय म्हणतात नागरिक…

आपली आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असली तरी करोना काळात भारत आणि डेन्मार्क दरम्यान संपर्क आणि सहकार्याची गती कायम होती, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

जवळपास वर्षभरापूर्वी आम्ही व्हर्च्युअल समिटमध्ये भारत आणि डेन्मार्क दरम्यान ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्थापित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. हा निर्णय उभायदेशांच्या दीर्घकालीन विचार आणि पर्यावरणाप्रती सन्मानाचं प्रतिक आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

आज भारत आणि डेन्मार्कनं पाणी आणि पर्यावरणशील इंधनावर काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. तसंच आम्ही आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांतही सोबत काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. हा हरित सहयोग महत्त्वकांक्षी आहे, असं यावेळी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी म्हटलं. आम्ही भारताकडे एक जवळचा सहकारी देश म्हणून पाहतो, असंही यावेळी मेट यांनी म्हटलं.

लखीमपूर हत्याकांड: मुख्य आरोपी आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर, चौकशी सुरू
Navjot Singh Sidhu: आशिष मिश्राला अटक होण्याअगोदरच सिद्धूंचं उपोषण मागे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here