नवी दिल्ली : हिंसाचार आणि त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमानं उत्तर प्रदेशासहीत राजधानी दिल्लीतही तणाव वाढलाय. शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासोबतच त्यांचा मुलगा याच्या अटकेची मागणी केलीय. सोबतच, शेतकरी संघटना लखीमपूर खीरीकडे कूच असल्याचं सूतोवाच संयुक्त किसान मोर्चानं केलंय.

लखीमपूर खीरीला शेतकरी जमणार
१२ ऑक्टोबर रोजी देशभरातील शेतकरी लखीमपूर खीरीला दाखल होऊन अस्थी कलश यात्रेत सहभागी होतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आलीय. सोबतच शेतकऱ्यांनी लखनऊमध्ये एका महापंचायतीचीही घोषणा केलीय. यानंतर १८ तारखेला ‘रेल रोको’ आंदोलनही करण्यात येणार आहे.

मोदी-शहा पुतळा दहन
तसंच १५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी शेतकरी आणि यांच्या पुतळ्याचं दहन करतील, अशी घोषणाही शेतकरी संघटनांनी केलीय.

नागरिकांना आवाहन
शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी हिंसाचारात शहीद झालेल्यांना शेतकरी आणि पत्रकार श्रद्धांजली वाहण्यासाठी लखीमपूरच्या तिकोनियामध्ये सगळे गोळा होतील. या दिवशी देशभरातील शेतकरी लखीमपूरला दाखल होतील. लखीमपूर हत्याकांड हे जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षा कमी नाही, असं म्हणतानाच देशाच्या नागरी संघटनांना आपापल्या शहरांत कॅन्डल मार्च काढण्याचं तसंच नागरिकांनी आपापल्या घरी संध्याकाळी ८.०० वाजता मेणबत्त्या पेटवण्याचं आवाहन योगेंद्र यादव यांनी केलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here