द्वारा लेखक | द्वारे संपादित गजानन सावंत | महाराष्ट्र टाइम्स. Com | अपडेट केलेले: ऑक्टोबर 9, 2021, 8:06 PM

Subodh Kumar Jaiswal: महाराष्ट्रात फोन टॅपिंग डेटा लीक प्रकरणावरून बरीच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना समन्स जारी करण्यात आले आहे.

सुबोध कुमार जयस्वाल

सुबोधकुमार जयस्वाल

हायलाइट्स:

  • फोन टॅपिंग डेटा लीक प्रकरणी तपासाला गती.
  • सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांना समन्स.
  • मुंबई सायबर पोलिसांनी बजावले समन्स.

मुंबई: महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागातून फोन टॅपिंग डेटा लीक झाल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक आणि सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना मुंबई सायबर पोलिसांनी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. १४ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. ( मुंबई पोलिसांनी सुबोध कुमार जयस्वाल यांना बोलावले )

महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्या आणि बढत्यांसंदर्भात काही खासगी व्यक्ती, पोलीस अधिकारी यांचे फोन टॅपिंग लीक झाल्याप्रकरणी शासकीय गुपिते अधिनियम आणि इतर कलमांतर्गत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी याआधी महिला पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. याच प्रकरणात सुबोधकुमार जयस्वाल यांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई सायबर पोलिसांसमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. जयस्वाल यांना ई-मेलच्या माध्यमातून हा समन्स पाठवण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बोलावले
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here