मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आर्यनचा सध्या मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. शुक्रवारी आर्यनच्या जामीन अर्जावर सुमारे चार तास न्यायालयात युक्तीवाद सुरू होता. मात्र, त्यानंतरही आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. आर्यनचे वकीलपत्र वकील सतीश मानशिंदे यांनी घेतले आहे. त्यांनी आर्यनला जामीन मिळावा यासाठी अनेक युक्तीवाद केले, परंतु त्यांच्या सर्व युक्तीवादांवर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी चोख प्रत्युत्तर दिले. युक्तीवाद करताना सिंह यांनी अरमान कोहली याच्या ड्रग्ज केसचा संदर्भ दिला. त्याच्या आधारावर आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

आर्यनच्या अटकेचा शाहरुख खानला फटका, BYJU ने जाहिराती थांबवल्या

आर्यनच्या जामीन अर्जावर झालेल्या युक्तीवादावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले की, याआधी याच कोर्टाने अरमान कोहलीचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. ज्याप्रमाणे अरमान कोहलीकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नव्हते तसेच आर्यनकडेही काहीही मिळाले नाही. तेव्हा कोर्टाने मान्य केले होते की अरमानशी संबंधित असलेल्या अन्य आरोपींकडे मात्र मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले होते.

आर्यन खान

Aryan Khan- तुरुंगातील दिनक्रम, ६ वाजता उठणं तर ७ वाजता नाश्ता

अनिल सिंह यांनी न्यायालयात सांगितले की, अरमान कोहलीच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी देखील असेच झाले होते. त्याच्याजवळ ड्रग्ज नव्हते तरी त्याच्यासोबत असलेल्या लोकांकडे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले होते. त्यामुळे त्यालाही अटक झाली होती. याच आधारावर त्याचीही जामीन याचिका फेटाळून लावली होती. ड्रग्ज खरेदी आणि विक्री प्रकरणी अरमान कोहली हा देखील दोन महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहात आहे. त्याला ड्रग्जच्या नशेमध्ये असताना ऑगस्टमध्ये एनसीबीने अटक केली होती. तर आता आर्यन खानची जामीन याचिका शनिवारी, सेशन कोर्टामध्ये दाखल केली जाऊ शकते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here