शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असेलल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डीएसके, त्यांचे कुटुंबीय व कंपनीच्या नावे असणारी १९ चारचाकी वाहने व एक महागडी दुचाकी जप्त केली होती. कोर्टाच्या आदेशानुसार १५ फेब्रुवारीला डीएसकेंच्या सहा गाड्यांचा लिलाव करण्यात आला. लिलावामध्ये या सहा गाड्यांसाठी ३९ लाख ४५ हजार रुपये इतकी किंमत मिळाली होती.
डीएसकेंच्या नावे असलेल्या विदेशी बनावटीची आणखी काही वाहने बाहेर असल्याचे पोलिस तपासात आढळून आले होते. त्यामुळे या गाड्या कंपनीच्या अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सर्व्हिसिंग व अन्य कामांसाठी येण्याची शक्याता होती. आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित सर्व सर्व्हिसिंग सेंटर्सना त्याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार मुंबईतील रे रोड येथील मधुबन टोयटा या सर्व्हिस सेंटर येथे लँड क्रूझर (एमएच १२ एमजे ९९९९) ही गाडी आल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबईत जाऊन पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times