म. टा. प्रतिनिधी, मुंबई

रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या प्रवाशाला वाचवताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. रामवीर सिंह गुर्जर असे त्यांचे नाव आहे. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान फटका गँगवर आळा घालण्यासाठी रामवीर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

रात्री उशिरा चर्चगेटकडे जाणारी लोकल येत असताना एक मद्यपी रेल्वे रूळ ओलांडत होता. लोकल येत असल्याचे लक्षात येताच तो भीतीमुळे गोंधळून गेला. मात्र त्याचवेळी रामवीर यांनी धाव घेत त्याला रुळाच्या बाजूला करून त्याचे प्राण वाचवले. मात्र या मद्यापीला सावरताना रामवीर यांचा तोल गेला आणि त्यांना अन्य मार्गावरून येणाऱ्या लोकलची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे मुंबई सेंट्रल विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त विनीत परब यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here