हायलाइट्स:

  • रोहित पवारांनी केलं काका अजित पवारांचं कौतुक
  • विरोधकांवरही साधला निशाणा
  • बारामतीतील कामांच्या पाहणीनंतर केलं ट्वीट

बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि अनोख्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार यांनी आजही बारामतीत सकाळी लवकर विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यानंतर रोहित पवार यांनी आपले काका अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

‘भल्या सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अजितदादा! गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता कायम आहे. विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही. आजही पहाटेच बारामतीत विविध कामांना भेट देऊन त्यांनी आढावा बैठक घेतली,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

शेवटी पायगुण लागतो; राणेंसमोरच शिवसेना नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

‘विकास कामं करताना दादांचं त्यावर बारकाईने लक्ष असतं. आज मीही त्यांच्यासोबत उपस्थित होतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांसारख्या खऱ्या अर्थाने कार्यकुशल आणि विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे,’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

एनसीबीने ‘ते’ फुटेज जाहीर करावं; नवाब मलिकांचे थेट आव्हान

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून साखर कारखाने आणि इतर संस्थांमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमुळे अजित पवार चर्चेत आहेत. या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. रोहित पवार यांनी या छाप्यांवरूनही नुकताच भाजपवर निशाणा साधला होता. ‘जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळालं आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई झाली. त्यामुळे राजकीय दृष्टीने अशी कारवाई होत असेल तर ती चुकीची असल्याचं आता लोकच म्हणू लागले आहेत,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here