हायलाइट्स:
- नव्या करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण
- राज्यात आज १,८२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के
राज्यात आज १,८२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर आजपर्यंत एकूण ६४,०१,२८७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३२ टक्के एवढं झालं आहे.
नव्या बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने या आजाराने होत असलेल्या मृतांची संख्याही कमी होत आहे. राज्यात आज २८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०१,९८,१७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,७७,८७२(१०.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,८९२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times