हायलाइट्स:
- गलवान हिंसाचारानंतर भारत चीन दरम्यान १३ वी चर्चा
- रविवारी पार पडली सैन्य अधिकारी स्तरावर चर्चा
- लडाखच्या हॉट स्प्रिंग भागातून दोन्ही देश सैन्य मागे घेणार?
भारत आणि चीनच्या सैन्य कमांडर्स दरम्यान सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी ७.०० वाजता संपुष्टात आली. चीनच्या पीएलए सेनेच्या मोल्डो गॅरिसनमध्ये ही बैठक पार पडली. पूर्व लडाखच्या गरम पाण्याचा झरा भागातून दोन्ही देशांच्या सैन्य माघारीसंबंधी यावेळी चर्चा झाली.
भारताकडून लेह स्थित १४ व्या कोअर (फायर अॅन्ड फ्युरी कोअर) चे कमांडर, लेफ्टनंट जनरल पी जी के मेनन यांनी बैठकीत सहभाग घेतला. तर दुसरीकडे दक्षिण शिन्चियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या कमांडरनं या बैठकीत चीनचं प्रतिनिधित्व केलं.
तब्बल १६ महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात घडलेल्या हिंसाचारासंबंधी चीनकडून आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही बैठक पार पडली. गलवान हिंसाचारानंतर या सीमेवर आतापर्यंत तब्बल १३ बैठकी पार पडल्या आहेत. या दरम्यान वास्तविक नियंत्रण रेषेच्या फिंगर एरिया, कैलास हिल रेंज आणि गोगरा भागात ‘डिसएन्गेजमेंट’ अर्थात सैन्या माघारीची प्रक्रिया पार पडली असली तरी हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग प्लेन्स या भागात अद्याप तणाव कायम आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times