मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीत चरित्र भूमिका आणि सुबोध भावे हे एक समीकरण झालं आहे. सुबोधनं यापूर्वी बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्र भूमिका साकारल्या आहेत. आता आगामी चित्रपटात तो पुन्हा चरित्र भूमिकेत चाहत्यांसमोर येत आहे.
तुमचं राजकारण सुरू राहू दे , पण…अमेय खोपकर यांनी केली केली ‘ही’ मागणी
दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात सुबोध छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाणार आहे. अभिजित यांनीच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामध्ये सुबोध डॉ. घाणेकर यांच्या भूमिकेत होता. याच चित्रपटात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या दृश्यासाठी सुबोधनं छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारली आणि त्याला चाहत्यांची दादही मिळाली.

त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत सुबोधला पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. अभिजित आणि सुबोध ही दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडी नवी कलाकृती घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here