ठाणे-कल्याण धीमा आणि पनवेल-मानखुर्द दरम्यान रविवारी मध्य रेल्वेने घोषित केला आहे. बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वेने जंबोब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक काळात तिन्ही मार्गावर रुळांच्या दुरुस्तीचे काम आहे. यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहे.
मध्य रेल्वे
स्थानक :ठाणे ते कल्याण
मार्ग : डाऊन धीमा
वेळ : स.११ ते दु. ४
परिणाम : ब्लॉक कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर. रविवार वेळापत्रकामुळे काही लोकल फेऱ्या रद्द. यामुळे लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने.
हार्बर रेल्वे
स्थानक : पनवेल-मानखुर्द
मार्ग :अप आणि डाऊन
वेळ :स.१०.१२ ते दु.४.२६
परिणाम : सीएसएमटी/पनवेल-बेलापूर-वाशी /सीएसएमटी लोकल बंद राहणार आहेत. पनवेल-ठाणे-पनवेल आणि नेरुळ ते बेलापूर-खारकोपर लोकल फेऱ्या ब्लॉक काळात बंद राहतील. या तिन्ही मार्गांवर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
स्थानक : बोरिवली ते गोरेगाव
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : स.१०.३५ ते दु. ३.३५
परिणाम : ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. बोरिवलीसाठी १,२,३,४ या फ्लॅटफॉर्मवरून कोणतीही लोकल उपलब्ध नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times