न्यूयॉर्क: अफगाणिस्तानातील शिया मशिदीवर ‘आयएस’ने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या हल्ल्याबाबत भारतानेही सुरक्षा परिषदेपुढे चिंता व्यक्त केली आहे. १५ सदस्य देशांच्या सुरक्षा परिषदेने शनिवारी रात्री एक निवेदन काढून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. अफगाणिस्तानातील कुंडुझ प्रांतात ८ ऑक्टोबरला हा दहशतवादी हल्ला झाला होता. यात १५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात भारताने अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला आहे. अफगाणिस्तानसह पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले, लक्ष्य होत असलेल्या शिया मुस्लिमांच्या संस्था आदी मुद्देही भारताने मांडले आहेत. विविध देशांमध्ये होणारे हल्ले, तेथील सुरक्षा यंत्रणांसमोर असलेली आव्हाने आदी गोष्टीबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तान: मशिदीवरील आत्मघाती हल्ल्यात ४६ ठार; आयएसने घेतली जबाबदारी
हे हल्ले रोखण्यासाठी सदस्य देशांनी येथील यंत्रणांवर दबाव टाकण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले. सुरुवातीला भारताने मांडलेला मुद्दा सुरक्षा परिषदेने खोडून काढल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र नंतर भारताचा मुद्दा समाविष्ट करूनच सुरक्षा परिषदेने सुधारित निवेदन प्रसिद्ध केले.

तैवान आमचा अंतर्गत मुद्दा, इतरांनी लुडबूड करू नये; चीनची धमकी
अफगाणिस्तानातील कुंडुझ प्रांतात शिया मुस्लिमांच्या मशिदीमध्ये शुक्रवारी घडविण्यात आलेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात ४६ हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. त्याशिवाय १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (आयएस) घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here