हायलाइट्स:
- सोलापूर जिल्ह्यात युवा सेना आक्रमक
- टायर पेटवून व्यक्त केला निषेध
- महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमिवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, दैनंदिन व्यवहार बंद
लखीमपूर खिरी येथील शेतकरी हत्यांच्या निषेधार्थ रोडवर टायर जाळून केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा याचा निषेध करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच यावेळी भारतीय शेतकरी जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या.
सांगलीत बंदला चांगला प्रतिसाद
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमिवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, दैनंदिन व्यवहार बंद करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू असून याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.
औरंगाबाद बंद
महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर गुलमंडी भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सातारा, देवळाई, उल्कानगरी, शिवाजीनगर परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद असून जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता इतर व्यवहार बंद आहेत. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाल्याची आवक नेहमी पेक्षा दहा ते वीस टक्क्यांनी कमी आहे.
नागपुरात बंद
नागपुरात विविध भागात काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले. बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली. मात्र, व्यापाऱ्यांची या आंदोलनाला पाठ दाखवली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times