सिंधुदूर्ग : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळतो. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला थंड प्रतिसाद मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दुकानदारांना बंदात सहभागी आवाहन केले गेले होते. मात्र, काही ठराविक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली होती.

कणकवलीत शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने रॅली काढत दुकाने जबरदस्तीने बंद करायला भाग पाडले जात होते तर दुसरीकडे भाजप कार्यकर्ते यांनी दुकाने उघडण्यास सांगून त्या व्यापार्यांना गुलाब देत गांधीगिरी केली.

महाराष्ट्र बंद : सोलापूर जिल्ह्यात युवा सेना आक्रमक, टायर पेटवून व्यक्त केला निषेधकणकवलीत महाविकास कार्यकर्ते रस्त्यावर उतरेल आणि बाजारपेठेत फेरफटका मारत दुकान बंद करायला लावली. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद केली. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांध्यासह महाविकास आघाडीचे नेते सहभागी होते

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सिंधुदुर्गात अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात सर्वत्र बाजारपेठा सुरळीत सुरू आहेत. इतकंच नाहीतर एसटी वाहतुकीवरदेखील बंदचा कोणताही परिणाम झाला नसून जिल्ह्यात सर्वत्र दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत. उत्तर प्रदेश लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीची बैठक घेत जनतेला बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी ९ ते १ पर्यंत बंद करण्याचे जाहीर केले होते. याचा कोणताही परिणाम झालेला नसून महाविकास आघाडीच्या बंदला पुरता फज्जा उडाल्याचेचं चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

महाराष्ट्र बंदचा तुमच्या जिल्ह्यात काय परिणाम? दुकाने, वाहतूक सुरू आहे का? वाचा सविस्तर

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here