हायलाइट्स:
- अमेरिकेची प्रसिद्ध खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर टीका
- मार्टिनाच्या ट्विटवर नेटकऱ्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया
गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रकाशित करण्यात आलेलं एक ट्विट रिट्विट करत ‘याहून हास्यास्पद काय असेल’ असं ट्विट मार्टिना नवरातिलोव्हा हिने केलंय.

मार्टिना नवरातिलोव्हाचं ट्विट
मार्टिना नवरातिलोव्हा ही आपल्या काळातील टेनिसमधली सर्वोत्तम खेळाडू राहिलीय. तिनं आपल्या करिअरमध्ये १८ ग्रॅन्डस्लॅम नावावर केलेत. समलैंगिक अधिकार तसंच लोकशाही मूल्यांचं समर्थन मार्टिनानं अनेकदा केलंय.
भारताच्या राजकारणाबद्दल अमेरिकेच्या टेनिस खेळाडूनं केलेल्या टिप्पणीनंतर यावर नेटकऱ्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
ट्रम्प – मोदी सरकारच्या धोरणांवर टीका
मार्टिनानं या अगोदरही अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली होती. भारतात लागू केल्या जाणाऱ्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’बद्दल मार्टिनानं २०१९ मध्ये एक ट्विट केलं होतं. ‘४० लाख भारतीय नागरिक कदाचित उद्यापासून राज्यातून निष्कासित केले जातील. वेळ सारखीच दिसतेय का? मोदी आणि ट्रम्प एकाच शाळेत शिकले नसले तरी दोघांची विचारधारा सारखीच आहे’, अशी तिखट टिप्पणी मार्टिनानं केली होती.
अमित शहान वक्तव्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १० ऑक्टोबर रोजी ‘संसद टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले जाणारे निरंकुश किंवा हुकूमशाही वृत्तीचे आरोप बिनबुडाचे आहेत’ असं म्हटलं होतं. ‘पंतप्रधान मोदींशी आपला अनेक दशकांपासूनचा संपर्क आहे. पंतप्रधान मोदी हे लोकशाही मानणारे नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा समजून आणि ऐकून घेणारा नेता आपण पाहिलेला नाही. पंतप्रधान मोदी छोट्यातल्या छोट्या कामगाराचेही धीराने ऐकतात’ असंही अमित शहा यांनी यावेळी म्हटलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times