स्टॉकहोम: जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी तीन अमेरिकन अर्थतज्ज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमेरिकतील डेव्हिड कार्ड, जोशुआ डी एंग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स या तीन अर्थतज्ज्ञांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

नोबेल पुरस्काराने सन्मानि होणारे अर्थतज्ज्ञ अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे, संशोधनाचे कार्य करत आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठात डेव्हिड कार्ड, मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जोशुआ डी एंग्रिस्ट आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुइडो इम्बेन्स हे कार्यरत आहेत. रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सने म्हटले की, या तीन अर्थ शास्त्रज्ञांनी आर्थिक विज्ञानात मोठे योगदान दिले आहे.

…म्हणून करोना लस संशोधकांऐवजी ‘या’ संशोधकांना मिळाला वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल!

Explainer रेणू निर्माण करणाऱ्या यंत्राला का मिळाला यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार
मागील वर्षी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना लिलावाच्या सिद्धांतातील (auction theory) योगदानाबद्दल अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाला होता. लिलावाच्या प्रारुपात सुधारणेसाठी या दोघांनीही मोलाचे कार्य केले आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सीसारख्या पारंपारिक मार्गाने एखाद्या वस्तूची, सेवेची विक्री करणे कठीण असते. अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाबाबतच्या प्रारुपाची रचना केली.

नोबेल २०२१: साहित्यातील नोबेल विजेते अब्दुलरझाक गुरनाह आहेत तरी कोण?
अर्थशास्त्राचे पारितोषिक अधिकृतपणे अर्थशास्त्रातील स्वेरिगेस रिक्सबँक पुरस्कार म्हणून ओळखले जातात. हे स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने सुरू केले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here