हायलाइट्स:

  • २८ वर्षीय युवकाने केली आत्महत्या
  • आत्महत्येचे कारण अस्पष्ट
  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू

सातारा : लोणंद येथील राजलक्ष्मी चित्रपटगृह परिसरात राहाणाऱ्या एका २८ वर्षीय युवकाने घरातील बेडरूममधे पंख्याला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश मारुती वायकर (वय २८) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजलक्ष्मी चित्रपटगृहाच्या पाठीमागील बाजूस राहणाऱ्या गणेश वायकर याने रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. कुटुंबातील व्यक्तींना गणेश घरात लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि त्यांना मोठा धक्का बसला. कुटुंबियांनी गणेशला खाली उतरवून उपचारासाठी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

FRP: ‘एफआरपी’वरून वादळ; ‘या’ साखर कारखान्याने घेतला मोठा निर्णय

या तरुणाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. याबाबत ज्ञानेश्वर वाईकर यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलीस नाईक योगेश कुंभार हे तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here