हायलाइट्स:

  • अकासा एअर’ या विमान कंपनीला केंद्र सरकारने आज सोमवारी परवानगी दिली आहे
  • प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची कंपनी आहे अकासा एअर
  • पुढील वर्षी म्हणजेच मे २०२२ च्या सुमारास अकासाची विमाने भारतात उड्डाणे घेतील, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : विमान सेवेतील प्रचंड संधीना हेरुन अवकाशी झेप घेण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एअर’ या विमान कंपनीला केंद्र सरकारने आज सोमवारी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे नुकताच झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्वतंत्र भेट घेतली होती. याला आठवडा पूर्ण होत नाही तोच झुनझुनवाला यांच्या विमान कंपनीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने याचसाठी ही भेट होती का अशी कुजबुज सोशल मीडियावर सुरु आहे.

सेन्सेक्स-निफ्टीचा रेकॉर्ड मात्र ‘टीसीएस’सह आयटी कंपन्यांचे शेअर गडगडले
केंद्रीय नागरी नागरी उड्डयन मंत्रालयाने अकासा एअरलाईन्सला विमान उड्डाणाचा ना हरकत दाखला दिला आहे. यावरून कंपनीला नागरी हवाई वाहतूक महासंचालक (डीजीसीएस) यांच्याकडे एअर ऑपरेटर परमिटसाठी अर्ज करावा लागणार आहे. अकासा एअर ही एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीअंतर्गत सेवा देणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच मे २०२२ च्या सुमारास अकासाची विमाने भारतात उड्डाणे घेतील, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.

निधी उभारणीला वेग; एअर इंडियासाठी टाटा समूह घेणार १५ हजार कोटींचं कर्ज
अकासा एअरची बोइंग आणि एअरबस या कंपन्यांसोबत सध्या विमान खरेदीबाबत चर्चा सुरु असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. झुनझुनवाला भारतातल्या विमान सेवेतील संधीबाबत प्रचंड आशावादी आहेत. त्यामुळेच त्यांनी नव्या विमान कंपनीसाठी मोठी गुंतवणूक केली आहे. केंद्र सरकारने ना हरकत दाखला दिल्यानंतर अकासा एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी आनंद व्यक्त केला आहे. कंपनी समाजातील सर्वच घटकांसाठी सेवा देईल, असे मत दुबे यांनी व्यक्त केले.

आर्थिक अहवाल जाहीर; अर्थ मंत्रालय म्हणते लसीकरणाचे अर्थव्यवस्थेला झाले असे फायदे
झुनझुनवाला यांनी या व्यवसायात सुमारे ३.५ कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपनीसाठी अनुभवी लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. ज्यात इंडिगोचे माजी सीईओ आदित्य घोष आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांचा समावेश आहे.

आरजे

राकेश झुनझुनवाला

सात दिवसांपूर्वी दिल्लीत घेतल्या भेटीगाठी
राकेश झुनझुनवाला सोशल मीडियावर वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले होते. झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला या दाम्पत्याने यांनी मंगळवारी ५ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून या भेटीचा फोटो शेअर केला होता. या भेटीत मोदींनी झुनझुनवाला यांचे भरभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये झुनझुनवाला यांच्याबाबत कौतुकास्पद उल्लेख केला होता. मात्र झुनझुनवालांच्या या भेटीगाठींबद्दल नेटिझन्समध्ये चर्चांना उधाण आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here