जालना :देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या आजच्या बंदला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. गुन्हेगाराला पाठीशी घालणं योग्य नाही, त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्याचा नैतीक अधिकार त्यांना राहणार नाही,’ अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली आहे.

महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद म्हणजे सरकारचा ढोंगीपणा आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली. यावर स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यांनी आक्षेप नोंदवत फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा द्यायला हवा होता असं म्हटलं आहे. ते जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडिगोड्रि इथं ‘जागर FRPचा, आराधना शक्तिपीठाची’ या संघर्ष यात्रेसाठी आलेले असताना बोलत होते.

भिवंडीतून ९ कोटी ३६ लाखांचा हुक्का फ्लेवर जप्त; राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होती विक्री

‘देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा सत्तेचा माज आलेला केंद्रीय मंत्र्याचा मुलगा शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालतो…यात ५ शेतकरी ठार होतात… हा निषेधाचा विषय नाही का?’ असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

‘गुन्हेगाराला जात, धर्म, पक्ष नसतो. केवळ फडणवीस यांच्या पक्षाच्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालायचं हे योग्य नाही. त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहणार नाही,’ असं शेट्टी म्हणाले. ‘आम्ही असं कधीही केलेलं नसून ज्यावेळी मावळ कांड घडलं त्यावेळी देखील आम्ही निषेध केला. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या नंतर आम्ही विरोधच केला. आता लखीमपूरमध्ये घटना घडली आहे, त्याचाही आम्ही विरोधच करणार आहे, कारण आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत,’ असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here