हायलाइट्स:
- तेलंगणातील कन्यका मातेचं मंदिर चर्चेत
- मंदिर सजावटीसाठी तब्बल ४,४४,४४,४४४ रुपयांच्या नोटांचा वापर
- आंध्रातही कन्यका माता मंदिर सजावटीसाठी चलनी नोटांचा वापर
कन्यका परमेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल होणारे भक्त अनेक प्रकारे दान – देणग्या देतात. यामध्ये नोटांसहीत सोन्या चांदीच्या दागिन्यांचा आणि वस्तूंचाही समावेश असतो.
यंदा भाविकांकडून देणगी स्वरुपात मिळालेल्या नोटांचाच वापर मंदिराच्या सजावटीसाठी करण्यात आवा आहे. मंदिर सजावटीसाठी नोटांना दुमडून त्यांना फुलांचं स्वरुप देण्यात आलं आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दूर्गामातेला महालक्ष्मीच्या रुपात सजवण्यात आलं आहे.
मंदिरातील मूर्ती आणि भिंतींना नोटा चिपकावून हे मंदिर सजवण्यात आलंय. त्यामुळे, भाविकांच्या नजराही मंदिरावरून लवकर हटताना दिसत नाहीत.
आंध्र प्रदेशातही मंदिर सजवण्यासाठी चलनी नोटांचा वापर
दुसरीकडे, आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातही कन्यका परमेश्वरी देवीचं मंदिर चलनातील नोटांनी सजवण्यात आलंय. तसंच सजावटीसाठी सोन्या – चांदीचाही वापर करण्यात आला आहे.
नवरात्री आणि दूर्गा पूजेच्या निमित्तानं नेल्लूर शहराच्या स्टोन हाऊस पेटा भागात स्थित हे कन्यका परमेश्वरी देवीचं मंदिर माता धनलक्ष्मीच्या रुपात सजवण्यात आलंय.
यासाठी मंदिरात भाविकांनी दान केलेल्या ५.१६ कोटी रुपयांच्या चलनी नोटांचा वापर करण्यात आलाय. यामध्ये २००० रुपये, ५०० रुपये, २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये आणि १० रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे.
दरवर्षी कन्यका मातेच्या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. भाविकांकडून लाखो रुपयांच्या देणग्या मंदिरांना प्राप्त होतात. या पैशांचा वापर मंदिर सजवण्यासाठी केला जातो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times