हायलाइट्स:
- तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन मिळणार नाही
- संस्थानाने जारी केली नवी नियमावली
- VIP दर्शनाला लगाम घालण्यासाठी मंदिर संस्थानानं मोठा निर्णय
व्हीआयपींना लगाम घालण्यासाठी मंदिर संस्थानाने व्हीआयपी दर्शन पासची नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे आता कोणालाही व्हीआयपी दर्शन घेता येणार नाही. तर दर्शनासाठी पास असणं आवश्यक आहे. काय आहे ही नियमावली जाणून घेऊयात…
देवीच्या दर्शनासाठी महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य व इतर कोणालाही मोफत अथवा व्हीआयपी पास दिला जाणार नाही. यामध्ये एखादी महत्त्वाची व्यक्ती असेल किंवा पत्नी, पती, मुलं, आई-वडील तसेच मंत्री महोदय, खाजगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी यांचाही यामध्ये सहभाग असणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्र्यांसोबत येणाऱ्या इतर व्यक्तींना घाटशील पार्किंगमधूनच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, अशी नियमावली तुळजापूर मंदिर संस्थानकडून जाहीर करण्यात आलेली आहे. खरंतर, करोनाच्या संकटामुळे गेले दीड वर्ष मंदिर बंद करण्यात आली होती. त्यामुळे आता मंदिर खुली होताच भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी धाव घेतली. यामुळे अनेक मंदिरांमध्ये रांगाच्या रांगा पाहायला मिळतात.
अशात मंत्री, नेते, अभिनेते आणि प्रसिद्ध व्यक्ती याचा फायदा घेत व्हीआयपी दर्शन घेतात. पण यामुळे सर्वसामान्यांना मात्र दर्शनासाठी उभं राहावं लागतं. पण हाच पायंडा मोडीत तुळजापूर मंदिर संस्थानानं मोठा निर्णय घेतला आहे. देवीच्या दर्शनासाठी व्हीआयपी पास बंद करण्यात आला असून सर्वांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभं राहून पास घेऊनच दर्शन मिळणार अशी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times