वाशिम: ईडीच्या रडारवर असलेल्या महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होऊ शकते. हाती आलेल्या माहितीनुसार, वाशिम इथं ईडीचे पथक दाखल झाले आहे. वाशिममध्ये तीन ठिकाणी हे पथक दाखल झाले असल्याची माहिती आहे. सध्या हे पथक वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आहेत. त्यामुळे या कारवाईमध्ये काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. (ShivSena bhavna gavli difficulty increases 3 teams of ED arrive in Washim)

खरंतर, गेल्या काही दिवसांआधीच भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली होती. सईद खानला विशेष पीएमएल न्यायालयाने मंगळवारी १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भावना गवळी, सईद खान व अन्य व्यक्तींविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवल्यानंतर सईदला २८ सप्टेंबरला अटक केली. कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

धक्कादायक! घरमालकाने आत्महत्येपूर्वी केलेल्या VIDEO ने पोलिसही हादरले, भाडेकराविेरुद्ध गंभीर आरोप
कोण आहे सईद खान?

सईद हा भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये संचालक आहे. पूर्वी विश्वस्त संस्था असलेली ही संस्था नंतर कंपनीत रूपांतरित करण्यात आली आणि त्यावर भावना गवळी यांच्या आई शालिनी व सईद यांना संचालक बनवण्यात आले. कंपनी निबंधकांकडे बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली आणि या कंपनीच्या माध्यमातून पैशांचा अपहार करण्यात आला, असा ईडीचा आरोप आहे.

आपल्या स्वीय सहाय्यकाने संस्थेत कोट्यवधींचा अपहार केला आहे, अशी पोलिस तक्रार भावना गवळी यांनीच गेल्या वर्षी मे महिन्यात वाशिममधील पोलिसांत दिली होती. त्या आधारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांना लक्ष्य केले होते. गवळी यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न उपस्थित करत सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली आणि गवळी व सईद यांच्याविरोधातच गुन्हा नोंदवला. (ShivSena bhavna gavli difficulty increases 3 teams of ED arrive in Washim)

तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन मिळणार नाही, संस्थानाने जारी केली नवी नियमावली
(शिवसेना भावना गवळीची अडचण वाढली ईडीची 3 टीम वाशिमला पोहोचली)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here