जालना : पोहायला गेलेल्या सहा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी खेळायला म्हणून बाहेर गेलेल्या सहा वर्षीय लहान मुलांचा पाण्यात बुडवून दुर्दवी मृत्यु झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या पिठारी शिरसगावात घडली आहे. आदित्य बालाजी सगळे अस या ६ वर्षीय बालकाचे नाव आहे. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

आदित्य काल सायंकाळी पाच च्या सुमारास खेळण्यासाठी म्हणून बाहेर गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या आई-वडील आणि गावातील नागरिकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, सगळीकडे तपास करून देखील रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याने आज सकाळी गावातील नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला. आज सकाळी आकरा वाजेच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या गल्हाटी नदी पात्राच्या पाण्यात या बालकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

धक्कादायक! घरमालकाने आत्महत्येपूर्वी केलेल्या VIDEO ने पोलिसही हादरले, भाडेकराविेरुद्ध गंभीर आरोप
या घटनेमुळे संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली. पोहण्यासाठी गेला असावा आणि नदीपात्रात जास्त पाणी असल्याने व आजूबाजूला कुणी नसल्याने पाण्यात बुडवून या बलकाचा मृत्यु झाला असावा असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला. या दुर्दवी घटनेने गावसह परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

शिवसेना खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, ईडीची ३ पथकं वाशिममध्ये दाखल

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here