दापोली : उपजिल्हाधिकारी संवर्गातील तसेच ‘डीएलआरएमपी’ या डीजीटल प्रणालीचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप तलाठी संघटनांनी केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. राज्य तलाठी संघटनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. याची दखल न घेतल्यास आजपासून आंदोलन तीव्र करू असा इशारा संघटनेने दिला आहे.

आज मंगळवारी तांत्रिक कामासाठी वापरल्या जात असलेल्या ‘डीएसपी’ तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात येतील असा इशारा त्यांनी दिला आहे. नैसर्गिक आपत्ती कामे फक्त सुरू राहतील अशी माहिती संघटना पदाधिकारी संदीप देवघरकर यांनी दिली. जिल्हाभर दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण रत्नागिरी या ठिकाणी हे निषेध आंदोलन करून सुरवात करण्यात आली आहे.
संध्याकाळी खेळायला गेला तो घरी परतलाच नाही, फोटोतल्या गोड मुलासोबत घडला धक्कादायक प्रकार
रामदास जगताप यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी हे आंदोलन आज सोमवारपासून राज्यभर सुरु करण्यात आले आहे. तलाठी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डुबल यांनी दिलेल्या निवेदनावरुन रामदास पाटील यानी चूकीची भाषा वापरली होती त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे. ई पीक पाहणी एप मधील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी, तांत्रिक दोष काढून टाकावे, ई-फेरफार मध्ये येत असलेल्या काही तांत्रिक समस्याही तात्काळ दूर कराव्यात अशी मागणीही मंडळ अधिकारी व तलाठी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.

विनोद जाधव दापोली तालुकाध्यक्ष व अमित शिगवण, जिल्हा सहचिटणीस यांनी सांगितले की, जगाप यांनी तालाठी संघटना अध्यक्ष यांना मुर्ख वैगेरे असे गैर व असंसदीय भाषा वापरली म्हणून आम्ही हे आंदोलन करत असल्याचे पत्रकारांजवळ बोलताना सांगितले.
शिवसेना खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, ईडीची ३ पथकं वाशिममध्ये दाखल

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here