न्यूयॉर्क- हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यांची मुलगी मकेलाने काही दिवसांपूर्वी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आता अवघ्या १० दिवसांमध्ये तिला अटक करण्यात आली आहे. घरगुती हिंसेप्रकरणी मकेलाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मकेला स्पीलबर्गला २९ फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजता अटक करण्यात आलं. यानंतर तिला डिटेंशन सेंटरमध्ये नेण्यात आलं. १ हजार अमेरिकी डॉलरवर तिला जामीन मिळाला. मकेलाच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला चुकून अटक करण्यात आल्याचं सांगितलं.

फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांनी मकेलाच्या पॉर्न स्टार होण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला असला तरी मकेलाच्या या निर्णयामुळे ते अगदी चिंतेत नक्की आहेत. त्यांच्या मते, मकेलाच्या या निर्णयाचा परिणाम त्यांच्या इतर मुलांवर कसा होईल याचा ते अधिक विचार करत आहेत. मुलांचं संगोपन चांगल्या पद्धतीने केल्याचं स्पीलबर्ग यांचं म्हणणं आहे.

मकेला म्हणाली की, ज्यावेळी तिने पॉर्नस्टार होण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने व्हिडिओ कॉल केला होता. मकेलाने पॉर्नहब येथे तिचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. मात्र देहविक्रीचा व्यवसाय करण्याचा परवाना तिच्याकडे नसल्यामुळे तिला ते व्हिडिओ काढून टाकावे लागले होते. एवढंच नाही तर मकेलाने मान्य केलं की, दररोज असं काम करून ती कंटाळली होती ज्याने तिच्या आत्म्याला शांती मिळत नव्हती. यासोबत शरीराचा वापर करून पैसे कमवता येत नसल्याचंही तिला दुःख होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here