हायलाइट्स:
- प्राणी संग्रहालयात पुन्हा झाला निष्काळजीपणा?
- दुसऱ्या मकाऊ पोपटाचाही झाला मृत्यू
- अन्न आणि पाणी वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला आरोप
देशी आणि विदेशी पक्षांना एकत्र ठेवता येत नसल्यामुळे या पोपटांना सिद्धेश्वर वनविहारात ठेवण्यात आलं होतं. एका पोपटाचा यापूर्वीच मृत्यू झाला असून रविवारी दुसर्या पोपटाचाही मृत्यू झाला आहे. हैदराबाद येथून हे दोन मकाऊ पोपट सोलापूरच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते. त्यांना देशी आणि विदेशी पक्षांसोबत एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे पथक सोलापुरात तपासणीसाठी आल्यानंतर त्यांना देशी आणि विदेशी पक्षी एकत्र ठेवण्यात आल्याचं दिसून आले. त्यानंतर सर्व विदेशी पक्षी वेगळे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार यातील काही पक्षांना वेगळे करण्यात आलं. तर त्यातील दोन मकाऊ पोपटांना वन विभागाच्या परवानगीने सिद्धेश्वर वन विहारात ठेवण्यात आले होते. त्या दुसऱ्या पोपटाचाही मृत्यू झाला आहे.
पक्षीमित्रांनी केलेल्या आरोपानुसार या पोपटाचे अन्नावाचून हाल होत असल्यामुळे व या पोपटांना वेळेवर पाणी किंवा अन्न मिळत नसल्यामुळे काही दिवसापूर्वी एका पोपटाचा अंत झाला, तर दुसऱ्याही मकाऊ पोपटाचा रविवारी अन्नपाण्याविना मृत्यू झाला असून वनविभागाच्या पिंजऱ्यात सडलेल्या अवस्थेत पोपट दिसून आले आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने महेश धाराशिवकर यांनी सोलापूर महानगरपालिकेसमोर पोपटाला श्रद्धांजली वाहून महापालिकेचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times