हायलाइट्स:

  • नुसरत जहां व यश दासगुप्ता यांचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल
  • नुसरत जहांने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो केले शेअर
  • फोटोमुळे नुसरत व यश यांचे लग्न झाल्याचे आले समोर

मुंबई: अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यावरुन चर्चेत आहे. तिने निखिल जैनसोबत विवाह केल्यापासून ते त्यांच्या काडीमोडपर्यंतच्या बातम्या नेहमीच चर्चेत राहिल्या. त्यानंतर तिच्या आणि बंगाली चित्रपट अभिनेता यश दासगुप्ता यांच्यातील संबंधावरील बातम्या येण्यास सुरुवात झाली. आता नुसरतने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ते पाहून तिने यश दासगुप्तासोबत लग्न केल्याचे दिसून येतं.

फोटोमुळे झाला खुलासा

खासदार व अभिनेत्री नुसरत जहां व अभिनेता यश दासगुप्ता नुकतेच पालक झाले. मात्र अद्याप या दोघांनीही त्यांच्या लग्नाची कोणतीही माहिती दिली नाही. १० ऑक्टोबरला यशचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने नुसरतने केकचा फोटो पोस्ट केला, ज्यावर नवरा आणि बाबा असे लिहिले होते.

नुसरत जहाँ

वाढदिवस केला साजरा

नुसरतने यशसोबतचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे, त्यात दोघेही डायनिंग टेबलवर बसलेले दिसत आहे. रात्री उशिरा नुसरतने यशला बर्थडे ट्रीट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘हॅपी बर्थडे’ पुढे तिने हार्टचा इमोजीही शेअर केला.

नुकताच मुलाला दिला जन्म

नुसरत जहांने २६ ऑगस्टला मुलगा ईशानला जन्म दिला. तिने सोशल मीडियावर तसे जाहीर केले नव्हते, मात्र ती गरोदर असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वांना त्याची माहिती समजली होती. नुसरत आणि निखिल यांनी २०१९ मध्ये तुर्कीमध्ये राजेशाही थाटात लग्न केले होते. मात्र काही काळातच त्यांच्यात काडीमोड होऊन त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here