माझ्यासाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. एनएसजीसाठी ज्या ज्या सुविधांची आवश्यकता आहे त्या सर्व देण्याच्या दृष्टीने आम्ही एक एक पाऊल पढे टाकत आहोत, असे शहा म्हणाले. या वेळी अधिक माहिती देताना म्हणाले की, एकाच वेळी सुमारे २४५ कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लोकार्पण आण भूमिपूजन करण्याचे काम झाले आहे. पाच वर्षांमध्ये एनएसजीने भारत सरकारकडून केलेल्या अपेक्षांची पूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
सरकार एनएसजीला चांगल्या सुविधा, चांगले घर नक्कीच देईल. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्व गरजांची पूर्तीही करेल. मात्र युद्ध हे हत्यारांवर नाही, तर बहादुरी आणि हिमतीवर जिंकले जाते असेही शहा म्हणाले. युद्ध हे हिमतीवर जिंकले जाते, हत्यारे तर केवळ एक भूमिका निभावत असतात. सामुग्री आणि तंत्रज्ञान कधीही बहादुरीचे स्थान घेऊ शकणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.
करावा लागला विरोधाचा सामना
गृहमंत्री अमित शहा रविवारी सकाळी कोलकाता विमानतळावर पोहोचले असता त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. अनेक राजकीय पक्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध दर्शवत विमानतळाबाहेर ‘वापस जाओ’च्या घोषणा दिल्या. पश्चिम बंगालचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी अन्य नेत्यांसोबत विमानतळावर शहा याचे स्वागत केले. डावे पक्ष आणि काँग्रेसच्या शेकडो निदर्शकांनी हातात सीएए विरोधी फलक घेत नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली.
सीएएच्या समर्थनार्थ शहा यांची सभा
निदर्शकांनी विमानतळावर प्रवेश करू नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्सही लावले होते. दरम्यान शहा आज शहीद मीनार मैदानात एक सभेला संबोधित करणार आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजुर झाल्याबद्दल पक्षाचे नेते शहा यांचा सत्कारही करणार आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त राज्याचे प्रदेशाध्य आणि नड्डा यांच्याशी शहा चर्चाही करतील. त्यानंतर शहा दक्षिण कोलकात्याक असणाऱ्या कालीघाट मंदिरातही जाणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times