हायलाइट्स:
- पुण्यात १४ वर्षीय मुलीच्या खून प्रकरणाने खळबळ
- तरुणाने कोयत्याने वार करून केला खून
- पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
खून झालेली मुलगी आठवी इयत्तेत शिकत होती. ती कबड्डी खेळाडू होती. बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे ती मित्रांसोबत कबड्डी खेळण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्या नात्यामधील तरुण त्या ठिकाणी आला. त्याने तिला बाजूला घेऊन जात तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हा दोघांमध्येही वाद झाले. त्यावेळी तरुणाने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्यावर केले.
हा प्रकार घडला त्या ठिकाणी इतरही तरुण-तरुणी कबड्डी खेळत होते. हा सर्व प्रकार पाहून सगळे घाबरून पळाले. या घटनेची माहिती मिळातच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, नात्यातील तरुण १४ वर्षीय मुलीच्या जीवावर का उठला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या खून प्रकरणाने बिबवेवाडी परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times