मुंबई: विधिमंडळ अधिवेशनचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची चिन्हं आहेत. पहिल्या आठवड्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास अपयशी ठरलेला भाजप मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही लावून धरण्याची शक्यता आहे.

लाइव्ह अपडेट्स:

>> अवकाळी पावसाच्या प्रश्नावर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार करणार निवेदन

>> अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का?, सरकारच्या निर्णयाकडं लक्ष

>> नव्या कायद्यामुळं राज्यातील जनतेच्या केसालाही धक्का लागू नये यासाठी आम्ही बांधील आहोत. खुद्द मुख्यमंत्र्यांचीही तीच भूमिका आहे – अजित पवार

>> सीएए, एनआरसी व एनपीआर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका – अजित पवार

>> आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र, प्रश्न सुटेपर्यंत ते आंदोलनावर ठाम आहेत – अजित पवार

>> मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली – अजित पवार

>> अजित पवार यांनी घेतली मराठा आंदोलकांसोबत बैठक

>> विधिमंडळ अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजणार

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here