मुगू जिल्हाधिकारी रोम बहादूर महत यांनी सांगितले की, करनाली प्रांतात मुगू जिल्ह्यात पिना गावात झालेल्या अपघात २४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जणांना रुग्णालयात दाखल करत असताना त्यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातग्रस्त बसमध्ये कर्मचाऱ्यांसह ४२ जण होते.
जखमी प्रवाशांपैकी १४ जणांना हेलिकॉप्टर आणि नियमित उड्डाणांच्या माध्यमातून नेपाळगंज येथे पाठवण्यात आले. मृतांमध्ये विद्यार्थी आणि श्रमिकांची संख्या अधिक आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. टायर फुटल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस दरीतून नदीत कोसळली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times