महाराष्ट्र पुन्हा सुरू: राज्यात 22 तारखेपासून तारखेपासून नाट्य आणि सिनेमागृह (Theather and Cinema Hall) 50 टक्के क्षमेतनं सुरु होणार आहेत. मात्र नाट्यगृह आणि थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्यात यावीत अशी मागणी करत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी (MP Dr Amol Kolhe) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहिलं आहे.  थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करा, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

येत्या 21 ऑक्टोबरपासून सरकारने 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु राज्य सरकारने हा निर्णय मागे घेऊन राज्यातील थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करावेत. कारण कोरोना काळातल्या लॉकडाऊनमुळे आणि शुटिंग्ज बंद असल्याने अगोदरच कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे राज्यातील थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करुन कलाकारांना दिलासा द्यावा, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कोल्हे यांनी पत्रात म्हटलं आहे की, थिएटर 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तर ते न करता थिएटर 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्याची मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. 50 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करणे आर्थिकदृष्ट्या कलाकारांना परवडणारं नाही, कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घेता 100 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 50 टक्के आसनक्षमतेनं थिएटर्स सुरु करण्याचा निर्णय व्यवसायाच्या मुळावर घाव घालणारा आहे.

Theater Reopen : थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करा, खासदार अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Theater Reopen : थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करा, खासदार अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Bollywood Movie : महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरु होणार असल्याने बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण

22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहे. राज्य सरकारने काल शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार आहेत. राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळुन खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले होते. यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करण्याचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य होते. निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे पालन करण्यास देखील सांगितले होते. यंदा देखील अशाच पध्दतीची नियमावली सरकार जाहीर करू शकते. कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी, प्रेक्षक अशा सर्वांनाच या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here