हायलाइट्स:

  • ‘मला कोणतीही नोटीस आली नाही’
  • रवी राणा यांच्या वक्तव्याने खळबळ
  • न्यायालयाकडे राणा यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी

अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने २८ लाख रुपये खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली होती, असे असताना अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी ४१ लाख ८८ हजार ४०२ रुपये खर्च केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमूख सुनील खराटे यांनी करत न्यायालयाकडे राणा यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती.

यावर नागपूर न्यायालयाने निवडणुकीमध्ये मर्यादेच्या बाहेर खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाला हे निर्देश देण्यात आले होते. तसेच ही कारवाई सहा महिन्यात पूर्ण केली जाईल, असेही सांगितले.

पुण्यातील जनता वसाहतीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
यानंतर न्यायालयाने हे निर्देश देऊन याचिका निकाली काढवी असं न्यायालयाने म्हटलं होतं. यासंदर्भात मूळ तक्रारकर्ते सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी याचिका दाखल केली होती. दरम्यान, आमदार राणा यांनी न्यायालयाच्या प्रकरणात प्रतिक्रिया देत मला या संदर्भात कुठल्याही प्रकारची न्यायालयाची नोटीस आली नाही तर न्यायालयात मी माझी बाजू मांडणार व मी मर्यादितच खर्च केला अशी मागणी रवी राणा यांनी दिली.

याचिकाकर्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी सांगितले की रवी राणा यांनी मर्यादीत खर्चापेक्षा अधिक खर्च निवडणूकीत केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा असं खराटे यांनी सांगितले.

कांद्यानंतर आता शेतकऱ्यांची संत्रीही चोरीला, ३ दिवसांत अडीच लाख संत्र्यांवर डल्ला

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here