रेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स | अद्यतनित: 13 ऑक्टोबर, 2021, सकाळी 10:48
चार तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेसहा वाजता अग्निशामक दलाने ही कार नदीपात्रातून बाहेर काढली. ही कार नदीतील ४० फूट खोल खड्ड्यामध्ये अडकली होती, असे सांगण्यात आले

देवीच्या दर्शनासाठी निघाले पण वाटेत मृत्यूने गाठलं, बंधाऱ्यात कार कोसळून सासू-सासरे आणि सुनेचा मृत्यू
हायलाइट्स:
- देवीच्या दर्शनासाठी निघाले पण वाटेत मृत्यूने गाठलं
- बंधाऱ्यात कार कोसळून सासू-सासरे आणि सुनेचा मृत्यू
- कार नदीतील ४० फूट खोल खड्ड्यामध्ये अडकली
मिळालेल्या माहितीनुसार, वैजिनाथ उमाजी चौधरी (५२), मंगल वैजिनाथ चौधरी (४५) आणि सुकन्या मधुर चौधरी (२१, तिघेही रा. शेलुद, ता. औरंगाबाद, ह. मु. गजानन नगर) अशी मृतांची नावे आहेत. ते कारने देवीच्या दर्शनासाठी जात असल्याचं सांगण्यात येत आहे. ते कारने (एमएच १४ ९६५८) जात असताना, जडगाव येथे त्यांची कार नदीच्या पाण्यात गेली. ही कार नदीपात्रात गेली, त्यामध्ये या तिघांचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कार काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. चार तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेसहा वाजता अग्निशामक दलाने ही कार नदीपात्रातून बाहेर काढली. ही कार नदीतील ४० फूट खोल खड्ड्यामध्ये अडकली होती, असे सांगण्यात आले. ही कार बाहेर काढण्यासाठी दिनेश मुंगसे, अब्दुल अजीज, लक्ष्मण कोल्हे यांनी मेहनत घेतली. दरम्यान, एकाच कुटुंबातील लोकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times