असमाई मंदिर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष राम शरण सिंह यांनी सांगितले की, नवरात्रीनिमित्ताने भजनासह महाप्रसादाचे आयोजन केले होते. यामध्ये गरजूंना अन्न वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमात जवळपास १५० जण सहभागी झाले होते. यामध्ये अफगाणिस्तानमधील हिंदूसह शीख समुदायातील व्यक्तीही सहभागी झाले होते.
या नागरिकांनी भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानमधून पुन्हा भारतात नेण्याचे आवाहनही हिंदू-शीख नागरिकांनी केले. सध्या अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हे मंदिर काबूलमधील ‘करते परवान’ गुरुद्वारापासून ४-५ किलोमीटर अंतरावर आहे. या गुरुद्वाराची मागील आठवड्यात काही संशयित तालिबानींनी तोडफोड केली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times